Top News

नेवासा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी बाजीराव पोवार यांची नियुक्ती

 

Appointment of Bajirao Powar as Inspector of Police, Nevasa Police Station

नेवासा : नेवासा पोलीस स्टेशनच्या (Newasa Police Station) पोलीस निरीक्षक पदी बाजीराव पोवार(PI Bajirao Powar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी रात्री पोलिस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी आदेश काढले. मागील काही दिवसांपूर्वी नेवासा पोलीस स्टेशनचे वातावरण कॉल रेकॉर्डिंगने चांगलेच ढवळुन निघाले होते.

बऱ्याच दिवसांपासून दोन वेळा नेवासा पोलीस स्टेशनचा चार्ज बदलण्यात आल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आल्याचे बघायला मिळत होते, मात्र आज अखेर नेवासा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे नेवाश्यातील वाळू तस्करी,जुगार,मटका अशा अनेक अवैध धंद्याला आळा घालण्याचे आवाहन आता नवीन पोलीस निरीक्षक यांच्या समोर असणार आहे.

(web title ; Appointment of Bajirao Powar as Inspector of Police, Nevasa Police Station) | Ahmednagar News | Newasa News | Bajirao Powar | Newasa Police Station

Post a Comment

Previous Post Next Post