Top News

पाचेगाव येथे ग्रामसभा पार पडली

 


पाचेगाव | प्रतिक आव्हाड : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे ग्रामसभा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच संगिता कांबळे या होत्या.अनेकांनी आपले मुद्दे मांडले. परंतु सर्वत्र वाळूचा मुद्दा वेठीस धरण्यात आला. 

यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले. कारवाडी येथे वाळु वाहण्याचे बैलगाडी चे दर कमी करणे ,पाचेगाव बाजार तळावर व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणे, पुनतगाव रस्ता, साईड गटारे, पाणी इत्यादी प्रश्नावर चांगली चर्चा झाली.

यावेळी उपसरपंच श्रीकांत पवार, तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब उंडे, सोसायटीचे चेअरमन प्रकाश जाधव, दिलीप पवार, वामन तुवर,डॅनियल देठे, शांताराम तुवर, हरिभाऊ तुवर, नारायण नांदे, दिगंबर तुवर, गोकुळ तुवर, सुधाकर शिंदे,सार्वमतचे पत्रकार अशोक तुवर, संदिप शिंदे, कानिफनाथ तुवर,विक्रांत पवार, अमोल शिंदे,दिपक शिंदे, बाबा राक्षे,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

(web titile : Gram Sabha was held at Pachegaon) | Pachegaon

Post a Comment

Previous Post Next Post