Top News

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात नकली नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश

 


पारनेर : पारनेर (Parner) तालुक्यातील वडगाव सावताळ (Vadgaon Savtal) येथे बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा (Fake currency factory) पारनेर पोलिसांनी (Parner police) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी विकास सुरेश रोकडे (Vikas Suresh Rokade) (वय १९) (रा. वडगाव सावताळ) या तरुणास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान आरोपी तरुणाकडून नोटा छापणारे मशीन, कटींग मशिन, पाचशे, शंभरच्या बनावट नोटा, खराब झालेल्या, चुरगळलेली नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक घनश्याम बळप (PI Ghanshyam Balap) यांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील स्टेट बँकेचे एटीएम २६ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पिकप च्या मदतीने चोरून नेण्यात आले होते.

या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींचा छडा लावून विकास रोकडे यास अटक केली होती. विकास रोकडे याची कसून चौकशी केली असता त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे निष्पन्न झाले.

त्याच्या घराची, आजीच्या घराची झडती घेण्यात आली, त्यावेळी शेतामधील आजीच्या घरात दडवून ठेवलेले रंगीत झेरॉक्स मशीन, कागदाची रिम, कटिंग मशीन, १०० व पाचशेच्या बनावट नोटा, चुरगळलेल्या, खराब झालेल्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.

आरोपी विकासकडे कसून चौकशी केली असता आपण बनावट नोटा तयार करीत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या बनावट नोटा त्याने कुठे वितरित केल्या, या रॅकेटमध्ये अजून कोण आरोपी आहेत ? याचा पारनेर पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. पथकामध्ये पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे, सुधीर खाडे, सुरज कदम, सत्यजित शिंदे, श्रीनाथ गवळी, सचिन लोळगे, पोलीस मित्र अभिजीत जाधव यांचा समावेश आहे.

(web title: Ahmednagar Breaking: Counterfeit note factory exposed in the district) | Ahmednagar News | Parner News | Fake money in ahmednagar| Fake currency in Ahmednagar | नकली नोट कारखाना | बनावट नोटा 

Post a Comment

Previous Post Next Post