Top News

ब्रेकिंग न्यूज : कन्नड घाटात दरी कोसळली ; पोलिसांनी सांगितला ‘हा’ पर्यायी मार्ग


औरंगाबाद | प्रतिनीधी : कन्नड भागात मुसळधार पावसामुळं तीन ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. (Kannada Ghat valley collapses) सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये (Auranagabad) मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं कन्नड घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे.

सोमवारी रात्री दोनच्या सुमारास कन्नड (Kannad) घाटात दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही गाड्यावरही दरड कोसळली असून सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, घाटात अनेक वाहने अडकली आहेत. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यानं वाहन अडकली आहेत. पावसाची संततधार सुरूच असल्यानं दरड हटवण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.

दरड कोसळल्याने धुळे- औरंगाबाद- सोलापूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांनी इतर मार्गाने प्रवास करावा असं अवाहन पोलिसांनी केलं आहे. औरंगाबादला जाण्यासाठी चाळीसगाव मार्गे प्रवास करावा. तर, पुण्याहून औरंगाबादला यायचं असेल तर जळगावकडून यावं असं अवाहन पोलिसांनी केलं आहे. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

(web title : Breaking News: Kannada Ghat valley collapses; "This is an alternative route," police said) | Aurangabad News | Kannad News | Kannad Dari

Post a Comment

Previous Post Next Post