Top News

स्वराज्य ध्वज चे जवळके गावात जल्लोषात स्वागत....

 

जवळके | गणेश चव्हाण : कर्जत/जामखेडचे लाडके व कार्यकुशलआमदार. रोहीत (दादा) पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वज यात्रेचे जवळके येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

जवळके गावातील प्रत्येक चौकात रांगोळी काढून व  महिलांच्या वतीने पूजन करून स्वागत करण्यात आले. तसेच तरुण मले, मुलींनी लेझिम , टाळ मृदुंग व हलगी,तासांच्या गजरात स्वागत करून गावातील लहान मुले ,आबाल वृद्धांनी ध्वजाचे दर्शन घेतले.तसेच मुस्लिम बांधवांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून दिले.

जवळके फटा ते  सटवाईमाता मंदिर येथे  मोठी मिरवणूक काढून साटवाईमाता मंदिरात ध्वज नेण्यात आला. तेथे ध्वज पूजन करून १५ऑक्टोबरच्या खर्डा(शिवपट्टन) येथील ध्वज स्थापना कार्यक्रमाची मान्यवरांनी माहिती दिली.सौ. सुनंदा (ताई)पवार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच संतोष पाटील हे  ध्वजाच्या स्वागताचे व आशीर्वादपर बोलले तर ह.भ.प.अप्पासाहेब महाराज पाटील यांनी आभार मानले.


 या प्रसंगी आईसाहेब सूनंदाताई पवार यांनी  तालुक्यात सर्वात जास्त लोकांचा सहभाग जवळके  गावातील महिलांचा ,तरुणांचा होता हे आवर्जून उल्लेख केला. 

Post a Comment

Previous Post Next Post