Top News

Dr. Poonam Nighute Sucide : डॉ. पूनम निघूते आत्महत्या प्रकरणी त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल

 


संगमनेर : संगमनेरातील महिला डॉ. पूनम योगेश निघुते (Dr. Poonam Nihute) यांच्या आत्महत्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येला (Sucide) प्रवृत्त केल्याबरोबरच हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉ. पूनम यांचे पती डॉ. योगेश निघुते (Dr. Yogesh Nighute) यांना या प्रकरणात आरोपी केले आहे.

मयत पूनम यांच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली आहे. गेल्या रविवारी (दि.२९) डॉ.पूनम योगेश निघुते यांनी आपल्या ताजणे मळा परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊ न आत्महत्या केली होती.

त्यांच्या माहेरच्या लोकांनी याबाबत संशय व्यक्त केल्याने डॉ. पूनम (Dr. Poonam) यांचे शवविच्छेदन (Post martom) औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात (Aurangabad ghati hospital) करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या माहेरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल घाटी रुग्णालयाने दिला आहे. अंत्यविधी उरकल्यानंतर मृत पूनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते (Sharad Kamlakar Kolte) (वय ३२, रा.जूना जालना) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात (Sangamner Police Station) डॉ. योगेश निघुते (Dr. Yogesh Nighute) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

मृत डॉ. पूनम (Dr. Poonam Nughute) यांच्या भावाने गेल्या दहा वर्षापासून डॉ. योगेश हा आपल्या बहिणीला कशा पद्धतीने शारीरिक व मानसिक यातना देत होता याची माहिती या तक्रारअर्जात दिली आहे. याशिवाय त्याच्या मागणीवरून तिच्या वडिलांनी वेळोवेळी बँक खात्यात भरलेल्या सुमारे साडेसात लाख रुपयांच्या रकमेचा तपशीलही फिर्यादीत देण्यात आला आहे. त्यावरून पोलिसांनी संगमनेरच्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ.योगेश यशवंत निघुते याच्या विरोधात पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करण्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Note : वरील बातमी ही लोकसत्ता यांच्या वेबसाइट वरुन घेण्यात आली आहे.  

(web title : Dr. Poonam Nighute Sucide police registered case against her husband) | Ahmednagar News | Dr. Poonam Nighute | Sangamner News | Dr. Yogesh Nighute | Sangamner Sucide News


Post a Comment

Previous Post Next Post