Top News

पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात घरफोडी करून पैसे दागिने चोरले



पाथर्डी | प्रतिनिधी : पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील केलवंडी येथे चोरट्याने घर फोडल्याची घटना घडली आहे . अज्ञात चोरट्याने घरातून  रोख रक्कम 50 हजार रूपए व 70 हजार रूपए किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून चोरट्याने पोबारा केला.  

26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गणेश जगन्नाथ आठरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस नाईक म्हस्के करीत आहेत.

(Web title :He-broke-into-a-house-in-a-village-in-Pathardi-taluka-and-stole-money-and-jewelery) | Ahmednagar News | Pathardi News |

Post a Comment

Previous Post Next Post