श्रीगोंदा | प्रतिनिधी : स्वस्तात सोने देतो असे अमिष देत झारखंडच्या एकला श्रीगोंदयातील (Shrigonda News) विसापूर गावाच्या शिवारात 10 ते 15 जणांनी मारहाण केली व त्याला लुटून पोबारा केला. मात्र याची फिर्याद दाखल होताच पोलीस यंत्रनेणे त्यातले काही जण ताब्यात घेत, त्यांच्याकडून काही रोख रक्कम जप्त केली.
दि.27 ऑगस्ट रोजी सुरज कुमार कारू साव (वय 24,काम-पोकलंड ऑपरेटर ,रा-थरमन ता,जी-बुखोरा झारखंड) याला कॉल करून तुला कमी किमतीत सोने देतो रेल्वेच्या पुलाजवळ बोलवून सोने खरेदीसाठी आनलेले सुमारे 1 लाख 20 हजार रुपये घेतले व 2 महिला व इतर 10-15 जणांनी त्याला दगडाने व काठ्याने मारहाण करत पळवून लावला.
याप्रकरणी बेळवंडी पोलीस (Belwandi Police) ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीस यंत्रणेने यासारखे गुन्हे आधी केलेल्या आरोपींचे फोटो दाखवली व आरोपीचा उखलगाव शिवारात शोध घेतला ,त्यापैकी काही फरार झाले असून 7 जणांना पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. त्यांच्या कडून 10 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
(Looted cheap gold, but confiscated within 2 hours) Ahmednagar News
Post a Comment