जामखेड | प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील आरणगाव (Arangaon) येथे एका 20 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील आरणगाव येथील कारंडे येथील अनिकेत विठ्ठल बांगर (वय २०) (Aniket Bangar) याने शनिवारी दुपारी चार वाजण्यापूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अनिकेत नुकतीच बारावीची (HSC) परीक्षा उत्तीर्ण झाला होता. अनिकेतने
आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही याबबात जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात
मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील
तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल हिंगसे
करत आहेत.
(Web title: 20-year-old commits suicide in Jamkhed taluka) | Ahmednagar News | Jamkhed News | Aarangaon News
Post a Comment