Top News

सातारा वाहतुक शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ शिंदे यांनी वाचवले युवकाचे प्राण

 


सातारा : सातारा  (Satara) शहरात एक तरुण पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल ड्रामा करत उडी मारणार असे वातावरण निर्माण झाले होते . त्याच क्षणी सातारा वाहतूक शाखेत कार्यरत असणारे अमंलदार श्री.सोमनाथ शिंदे यांना याची माहिती समजली.

सोमनाथ शिंदे (Somnath Shinde) यांनी कशाची ही पर्वा न करता भल्या उंच टाकीवर जाण्याचा निर्णय घेतला. टाकीवर जाऊन युवकाला वाचवणे महत्वाचे होते परंतु कशाचाही विचार न करता युवकाचा जीव वाचवण्यासाठी सोमनाथ शिंदे यांनी धाडसाने टाकीच्या दिशेने आगेकूच सुरू केली. 

परंतु हे सगळे गोपनीय पद्धतीने चालले होते कारण टाकीवर पोलीस येत आहेत हे समजल्यावर युवकाने उडी मारली तर काय होईल ? असे अनेक प्रश्न शिंदे यांच्या मनात आले होते. तरी देखील शिंदे यांनी धाडस दाखवत यशस्वी रीत्या त्या युवकावर झेप घेत त्याचे समूपदेशन करून त्याला खाली उतरविण्यात यश आले.

(web title : Satara Traffic Branch Police Naik Somnath Shinde saved the life of the youth)

Post a Comment

Previous Post Next Post