Top News

संगमनेर ब्रेकिंग : कंटेनर व मालवाहू ट्रकचा अपघात

 


संगमनेर : संगमनेर (sangamner)तालुक्यातील तळेगाव दिघे (talegaon dighe accident) येथील बाजारतळजवळील ओढ्यात असलेल्या पुलादरम्यान अपघाती वळणावर मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारा एका मालवाहू ट्रक व कंटेनरची धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघे जण वाचले आहे. अरुंद रस्ता व पूल यामुळे अपघात सत्र सुरूच आहे. या महामार्गाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त आहे.

लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने नाशिककडून नगरच्या दिशेने चालक अंकित राजभर (Ankit rajbhar) हा मालवाहू कंटेनरमधून इलेक्ट्रोनिक साहित्य घेऊन जात असताना नगरहून नाशिकच्या दिशेने रिकामा मालट्रक जात होता. ट्रक व कंटेनरची तळेगाव दिघे बाजारतळजवळील पुलादरम्यान पश्चिमेस बाजूस अपघाती वळणावर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या कडेला पुलाच्या साईड गटारात अडकला. अपघातातून कंटेनर चालक अंकित राजधर व अन्सूल राजधर (Ansul rajdhar)  रा. उत्तरप्रदेश व मालवाहू ट्रक चालक असे तिघे जण बचावले.

----------------------------------------

हे देखील वाचा : 

----------------------------------------

(web title: Sangamner braking: Container and cargo truck accident) | Sangamner news | Ahmednagar news | Sangamner accident news | latest news

Post a Comment

Previous Post Next Post