![]() |
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या साठी आमचा Whastapp ग्रुप जॉइन करा. |
नेवासा | प्रतिनिधी प्रतिक आव्हाड : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे आज प्रहार अपंग क्रांती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी अपंगा वर होणारा अन्याय, अपंगांना घरकुल मिळण्याबाबत ची माहिती, ग्रामपंचायतचा अपंगांना मिळणाऱ्या पाच टक्के निधी कशा प्रकारे मिळतो या विषयी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो या विषयी माहिती प्रहार अपंग क्रांती तालुकाअध्यक्ष मा. श्री. दादासाहेब शेजुळ यांनी दिली.
यावेळी प्रवारासंगमचे सरपंच श्री. संदीप सुडके यांनी शेजुळ यांचा सत्कार केला.
यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे संदीप आव्हाड, सोमनाथ कहार,
संतोष सुडके, सतीश देसाई, गणेश मोटे, नरेश मुळे, बाबा
पाठे, दिलीप खंडागळे व प्रहार सैनिक उपस्थित होते.
Post a Comment