Top News

राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार असलेल्या आरोपीला तब्बल साडे तीन वर्षा नंतर अटक

 


राहुरी : साडे तीन वर्षापूर्वी 2018 मध्ये राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला साडे तीन वर्षांनंतर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक (Arrest) केली आहे.

अंकुश सोपान बर्डे (Sopan Barde) रा. बारागाव नांदूर (Baragaon nandur) ता. राहुरी (Rahuri) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

एप्रिल 2018 मध्ये सोपान बर्डे व त्याच्या इतर साथीदारांनी राहुरी (Rahuri) तालुक्यातील एका व्यक्तीच्या घरातून एका  अल्पवयीन मुलीला पळवून नेत त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 2018 पासून सदर आरोपी पसार होता.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अनिल कटके (Anil Katke) यांचे पथक पसार आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी बर्डे राहुरी बस स्थानक परिसरात (Rahuri bus stand) असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार निरीक्षक कटके यांनी सदर ठिकाणी सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, विशाल दळवी, शंकर चौधरी, सागर ससाणे, रणजित जाधव हे पथक पाठविले. या पथकाने आरोपी बर्डे यास अटक केली असून करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

----------------------------------------

हे देखील वाचा : 

----------------------------------------

(web title: Accused of torturing a minor girl in Rahuri taluka arrested after three and a half years) | Ahmednagar news | Rahuri News | Rahuri latest news | Ahmednagar Police

Post a Comment

Previous Post Next Post