Top News

जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार ; 700 ते 800 जनावरे वाहून गेल्याची शक्यता

 


Jalgaon Rain Updates | जळगाव : जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात मध्य रात्रीच्या सुमारास झालेले मुसधार पावसाने डोंगरी (Dongri River Flood)आणि तीतुर नदीला (Titur river flood) आलेल्या पुराचे पाणी 15 गावात शिरल्याणे हाहाकार उडाला आहे. या पुरामुळे जवळपास सातशे ते आठशे जनावरे आणि पाच ते सात माणसे वाहून गेल्याची भीती आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. . 

जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुरामुळे अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झाले आहे. अनेक गावात घराच्या समोर बांधलेली शेकडो जनावरे आणि काही नागरिक वाहून गेल्याची भीती आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. 

अद्यापही चाळीसगाव तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शहराच्या अनेक भागात आणि अनेक गावात पाणी शिरले असल्याने या ठिकाणचं जनजीवन विस्कळित झाले आहे.

(web title: Rains in Jalgaon district; Possibility of carrying 700 to 800 animals) | Jalgaon Rain | Jalgaon flood | Chalisagaon Flood

Post a Comment

Previous Post Next Post