Top News

अकोले तालुक्यातील अंभोळ येथील महिला हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 2 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

 


अकोले : अकोले तालुक्यातील आंभोळ (Ambhol) येथील महिलेच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या दोन  युवकांना आज न्यायालयापुढे उभे केले असता, न्यायालयाने दोघांना येत्या दोन तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर बातमी अशी की कांताबाई तुकाराम जगधने वय ६५ या (Kantabai Tukaram Jagdhane) महिलेच्या घराची कौले चाळण्यास आलेल्या दोघा युवकांनी महिलेच्या प्रतिकारामुळे दागिने चोरताना तिची हत्या केली होती आणि प्रत्यक्षदर्शीनी या दोन आरोपींना ओळखले म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.


त्यांच्या अटकेनंतर त्यांना आज दुपारी अकोले पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना येत्या दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.

(web title: The court remanded the accused in police custody till date 2 in the case of murder of a woman at Ambhol in Akole taluka) | Ahmednagar News | Akole News | Ambhol News

Post a Comment

Previous Post Next Post