Top News

धक्कादायक : सासर्यााने सुनेकडे केली शरीर सुखाची मागणी

image credit goes to respective owners


एक्स्प्रेस मराठी : श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे सासर्‍याने चक्क सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासऱ्याविरोधात श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी अशी की पीडित महिला ही तिच्या पती व दोन मुलांसह राहते सदर महिलेची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे . महिलेच्या अंगावर कोडे फुटलेले असल्यामुळे तिला घरातील लोक कायम त्रास देतात. २५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पीडित महिला व तिची मुले जेवण करून झोपण्यासाठी गेले असता महिलेचा सासरा दारू पिऊन सुनेजवळ आला व तिच्याजवळ शरीर सुखाची मागणी करू लागला. पिडीत महिलेने नकार देऊन त्याला घराबाहेर काढून दिले पण जाताना सासऱ्याने सुनेचा विनयभंग करून मारहाण केली.

पीडित महिलेने सदर घडलेली घटना बाहेरगावी गेलेला पती घरी आल्यावर पतीला सांगितला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल लता पुराणे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post