नाशिक | प्रतिनिधी : नाशिकच्या येवले
तालुक्यातील तलाठी विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता तर एक तलाठ्याने
चक्क दुसऱ्याच्या सातबाऱ्यावर स्वतःच्या बायकोच नाव वारस म्हणून चढवल्याचा
धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. या तलाठ्याने
8 एकर
जमिनीचा सातबाराच्या बदलला.
मंदा
पवार या नाशिकच्या येवले तालुक्यातील हडपसरगाव येथे राहतात.आई-वडिलांच्या मृत्यू
नंतर शेतजमिनीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी त्या तहसीलदार कार्यालयात गेल्या
होत्या,मात्र तिथे जाताच त्यांना धक्का बसला.कारण त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर
दुसऱ्याच कोणाच्याच कुणाचतरी वारस म्हणून नाव चढलं होत. थोडा तपास केल्यावर
ठाणगावाचे तलाठ्याने आपली
स्वतच्या पत्नीच्या माहेरच्या
नावानं वारस नोंद केल्याचं
समोर आलाय. तलाठ्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत दोन वेगवेगळ्या ठिकाणची 8 एकर जमीन हडप
केल्याचा आरोप पवार यांनी केला असून,वारस म्हणून आपली
नोंद व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
Post a Comment