मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली (Arman Kohli Arrest ) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (NCB) कोहली ची चौकशी व इतर कोण यात सामील आहे त्याची चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा देण्याची न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मेनी केली व अरमान कोहलीला एनसीबीच्या ताब्यात दिलं आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी करणारा राजू सिंहला (Raju Singh) सुद्धा न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
शनिवारी एनसीबीने कारवाई करत अरमान कोहलीच्या घरावर छाप टाकला होता. त्यात अरमानच कोहलीच्या राहत्या घरात काही प्रमाणात कोकेन व इतर नशैली पदार्थ आढलुन आले. २९ ऑगस्ट रोजी अरमानला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीत न्यायालयाने अरमान कोहलीची अधिक कसून चौकशी करण्याचे आदेश देत त्याला एका दिवसाची कोठडी सुनावली.
(web title : Bollywood actor Arman Kohli has been remanded in custody for a day) | Arman Kohli Arrest news in marathi | NCB | Express Marathi
Post a Comment