Top News

आता सात बारा उतारा मिळणार मोफत आणि घरपोहोच ? जाणून घ्या महसूल विभागाचा नवीन निर्णय

एक्स्प्रेस मराठी : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा (saat bara) नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी सोमवारी ही घोषणा केली. राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी (E - pik pahani), संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे.

खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहित व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खाते उताराची ही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाईल. महसूल विभागातील कोतवाल(Kotwal), तलाठी (talathi)त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंतीपासून सुरू करणार आहेत. 


खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. नागरिकांना सहज व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. आगामी काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. बाळासाहेब थोरात,महसूलमंत्री,

(web title: Now you will get seven or twelve transcripts for free and home delivery? Learn the new decision of the revenue department) | Saat Bara | Balasaheb Thorat | Mahsul Vibhag

Post a Comment

Previous Post Next Post