Top News

राहुरी स्टेशन रोडवर अपघातात 1 ठार तर एक जण गंभीर जखमी

 


राहुरी : मंगळवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनात भीषण अपघात झाल्याची घटना राहुरी स्टेशन रोडवर (Rahuri station road) घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एक जन ठार तर एक जन गंभीर जखमी झाले आहे.  

राहुरी स्टेशन रोडवर पेट्रोल पंपासमोर साडेचार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. मानोरी (Manori) गावातील स्वीट डिझायर आणि सीटी 100 या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.

या अपघातात राहुरी (Rahuri) तालुक्यातील मानोरी येथील दुचाकीस्वार अजमतखा पठाण (वय 60) (Amajatkhan Pathan) यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी हलीमा अजमतखा पठाण, वय 53 (Halima Amjatkhan pathan) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अहमदनगर (Ahmednagar) येथे एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

(web title: One killed and one seriously injured in an accident on Rahuri Station Road) | Ahmednagar news | Rahuri News | Rahuri accident news | Manori

Post a Comment

Previous Post Next Post